संजय राऊत कोणाचे प्रवक्ते माहितीय, आपली उंची किती, पंतप्रधानांची किती?, फडणवीसांचा पलटवार

संजय राऊत कोणाचे प्रवक्ते माहितीय, आपली उंची किती, पंतप्रधानांची किती?, फडणवीसांचा पलटवार

मुंबई: संजय राऊत हे कोणाचे प्रवक्ते हे पहिल्यापासूनच आम्हाला माहीत आहे. पण मला असं वाटतं की, हाच विचार पंतप्रधानांबद्दल बोलताना संजय राऊतांनी करावा. आपली उंची किती, पंतप्रधानांची किती तर मला असं वाटतं हे बोलण्याचा अधिकार त्यांना मिळेल, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर पलटवार केलाय. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनता भाजपसोबत आहे. जनतेनं देशात मोदीजींचं सरकार पाहिलंय. गोव्यात भाजपचं सरकार पाहिलंय. आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जनतेनं जवळून पाहिलंय. सर्व एकत्र येऊन काही फरक पडेल, असं मला वाटत नाही. गोव्यात शिवसेनेची अवस्था अशी आहे की, त्यांना कोणत्या तरी एका जागेवर डिपॉझिटही जप्त करण्यापासून वाचायचं आहे.

भारतीय जनता पार्टी पूर्णतः या निवडणुकीसाठी तयार आहे. आमची बूथपर्यंतची रचना झालेली आहे. कन्सल्टेशनची प्रोसेस आमची पूर्ण होतेय. प्रत्येक मतदारसंघात कोण उमेदवार असावा याकरिता कार्यकर्त्यांचं सीक्रेट बॅलेट पेपरनंही आम्ही ओपिनियन घेतोय. त्यामुळे आम्ही पूर्णतः तयार आहोत. त्यांची लढाई नोटाशीच आहे, पण NOTA हे जे नोटा आहे. ज्यात मतदार कोणालाही मतदान द्यायचं नाही, असं जे बटन दाबतो. ती जेवढी मतं असतात, त्यापेक्षा जास्त जरी मतं मिळाली पाहिजेत हे मला मान्य आहे. काही पक्षाला सोडचिठ्ठी देतायत, तर काही येतायत. ज्यांना लक्षात येतंय, ज्यांच्याविरुद्ध अँटी इन्कबन्सी असल्यामुळे भाजप त्यांना तिकीट देणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

असे लोक दुसऱ्या पक्षात चाललेत आणि जे निवडून येणार आहेत ते आमच्या पक्षात येतातय. संजय राऊत हे कोणाचे प्रवक्ते हे पहिल्यापासूनच आम्हाला माहीत आहे. पण मला असं वाटतं की, हाच विचार पंतप्रधानांबद्दल बोलताना संजय राऊतांनी केला. आपली उंची किती, पंतप्रधानांची किती तर मला असं वाटतं हे बोलण्याचा अधिकार त्यांना मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय.


हेही वाचा: पोलिसांच्या बदल्यांची ती यादी खोडसाळपणाने व्हायरल, गृहमंत्री वळसे पाटलांकडून चौकशीचा आदेश

First Published on: January 12, 2022 2:29 PM
Exit mobile version