…आणि फडणवीस ढसा ढसा रडले, पक्षाचा आदेश मानत उपमुख्यमंत्री बनले

…आणि फडणवीस ढसा ढसा रडले, पक्षाचा आदेश मानत उपमुख्यमंत्री बनले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांना होतीच त्यानुसार मागील काही महिने रणनिती सुरु होती. मात्र केंद्रीय नेतृत्वाने उपमुख्यमंत्री पदाचा अचानक दिलेला शॉक असा एवढा जबर धक्का फडणवीस यांना होता की, ते सागर बंगल्यावरील समर्थकांची बैठक सोडून खोलीत गेले आणि आपल्या भावनांना वाट करुन ढसा ढसा रडले

गुरुवारी ४ वाजताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पदभार सांभाळतील अशी घोषणा केली. फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा करताच उपस्थित भाजपचे नेते आणि माध्यमकर्मीयांच्यासुद्धा भुवया उंचावल्या होत्या. एकनाथ शिंदे राज्याचा कारभार करतील आणि मी सरकारबाहेर राहून सहकार्य करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर फडणवीस पुन्हा आपले शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्यासोबत असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संताप व्यक्त करत असा निर्णय का घेतला? असा प्रश्न केला. देवेंद्र फडणवीस नेत्यांना समजावत होते तोच राष्ट्रीय भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा फोन आला आणि त्यांनासुद्धा उपमुख्मंत्रीपदाची शपथ घ्या असे सांगण्यात आले. यावेळी फडणवीसांचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रूदेखील दिसत होते.

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेतील आणि त्यांच्या एकट्याचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडेल अशी फडणवीसांनी घोषणा केली. त्यावेळी त्यांची देहबोली बोलकी होती. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांनी सरकार पाडण्यासाठी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी धडपड करत होते. परंतु जेव्हा भाजपचे सरकार येत असताना केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सांगितले. तसेच फडणवीस यांनी केले. परंतु राजभवन सोडून सागर बंगल्यावर गेल्यावर फडणवीस एका खोलीत गेले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली आणि ढसाढसा रडले. फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी जे. पी नड्डा यांनी सांगितले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोनसुद्धा आला होता. सुरुवातीला फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार नव्हते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते नकार देऊ शकत नाहीत. यामुळे फडणवीसांनी शपथविधीदरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

हे चित्र फार बोलकं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपला फडणवीसांसारखा चेहरा सापडेना

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार होते. शिंदे सरकार फडणवीसांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेणार होते. परंतु सरकारमध्ये गृहमंत्री आणि वित्तीयखाते सांभाळण्यासाठी भाजपला दुसरा सक्षम चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली. परंतु केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज होते. त्यांची देहबोलीसुद्धा बदलली होती. फडणवीसांसोबत असलेले भाजचे खासदार, आमदार, केंद्रीय नेत्यांनासुद्धा धक्का बसला होता. सागर बंगल्यावर गेल्यावर या नेत्यांच्या भावनासुद्धा दाटून आल्या होत्या. खासदार धनंजय महाडिक यांचाही आवाज माध्यमांना प्रतिक्रिया देताना कंठ दाटून आल्यासारखा झाला होता.


हेही वाचा : …तर धनुष्याची दोरी मागे ओढावी लागते; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

First Published on: July 1, 2022 5:09 PM
Exit mobile version