शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही,भाजप स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल – फडणवीस

शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही,भाजप स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल – फडणवीस

देवेंद्र फडणवीस

‘शिवसेनेला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, भाजप स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल’, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्याचं पावसाळी अधिवेशन सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकललं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

बिहारच्या राजकारचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते, ‘राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली तरी निवडणुका एकत्र लढणार नही. आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता आहे’, Dmx ते म्हणाले.

उद्धव ठाकरे हे एमआयएमची भाषा बोलत आहेत

आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होईल, आम्ही ठिकठिकाणी हा महोत्सव साजरा करू. व्हिडिओ कॉन्फरन्सने भूमिपूजन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एमआयएमची मागणी ऐकून आश्चर्य वाटलं आहे. उद्धव ठाकरे हे एमआयएमची भाषा बोलत आहेत. राम मंदिर भूमिपूजन त्याच ठिकाणी व्हावं, ही सर्वांची इच्छा आहे. असे फडणवीस यांनी सांगितले.


हे ही वाचा – कोरोनाच्या नावाखाली जमा केलेल्या निधीवर मौजमजा, त्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी आणि..


First Published on: July 28, 2020 7:05 PM
Exit mobile version