मुख्यमंत्र्यांची भाजपला खुली ऑफर, फडणवीस म्हणतात मला तसं चित्र दिसत नाही

मुख्यमंत्र्यांची भाजपला खुली ऑफर, फडणवीस म्हणतात मला तसं चित्र दिसत नाही

मुख्यमंत्र्यांची भाजपला खुली ऑफर, फडणवीस म्हणतात मला तसं चित्र दिसत नाही

आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी होतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असून एक प्रकारे भाजपला खुली ऑफर दिली असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु राजकारणात कधी काहीही होऊ शकतं, मात्र मला तसं दिसत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांना या सरकारमुळे राज्याचे नुकसान होत असल्याचे कळून चुकले असावे म्हणून त्यांनी तसे वक्तव्य केलं असेल असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांची खुली ऑफर असली तरी आम्ही विरोधी पक्षात राहून जनतेची काम करणार आहोत. सध्या आम्ही सत्तेसाठी प्रयत्न करत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणीस यांनी म्हटलं आहे की, “चांगली गोष्ट आहे. राजाकरणात कधीही काहीही होऊ शकतं मात्र भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कुठेही सत्तेकडे डोळे लावून बसलो नाही आहोत. आम्ही विरोधी पक्षनेत्याची आणि विरोधी पक्षाची भूमिका करत आहोत. हे जे काही अनैसर्गिक प्रकारचे गठबंधन झाले आहे ते फार काळ चालू शकत नाही. कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्षात आलं असेल की अशा प्रकारचे अनैसर्गिक गठबंधन करुन महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असेल असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

मला तस चित्र दिसत नाही – फडणवीस

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, राजकारणात काधीही काहीही होऊ शकते. परंतु आज मला तसं दिसत नाही. भाजप सरकार बनवण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या आशा आणि आकांक्षा घेऊन आंदोलन करत आहोत. सरकारला उत्तरदायित्व भाजप शिकवत आहे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याचा एवढाच अर्थ काढूया की, मुख्यमंत्र्यांना लक्षात आलं आहे की, ते कशा प्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवत आहेत. आणि ते सरकार कशाप्रकारे चालवले जात आहे. किती भ्रष्टाचार होत आहे. याबाबत त्यांना कळालं असेल म्हणून ते असे बोलत असतील असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोध केल्यास आंदोलन करु – फडणवीस

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत म्हणून सांगायचे आणि ते भाव कमी करण्यासाठी पेट्रोल डिझेलचे भाव जीएसटी अंतर्गत आणण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारने आणला आहे. यामध्ये २० ते २५ रुपयांनी पेट्रोल, डिझेलची किंमत कमी होऊ शकते. तर याला विरोध करत आहेत. तर यांची भूमिका दुटप्पी आहे. कालपर्यंत सायकल घेऊन का निघाला होता? यांचा खरा चेहरा समोर आला आहे. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं पेट्रोल डिझेलच्या भाव वाडिवर बोलणं बंद केले पाहिजे. जर यांनी पेट्रोल डिझेलचे भाव जीएसटीच्या प्रस्तावात आणण्यासाठी विरोध केला तर आम्ही यांच्याविरोधात आंदोलन करु असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी भाषणादरम्यान सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोलेबाजी केल्यावर मुंख्यमंत्र्यांकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी एकत्र आले तर भावी सहकारी होतील असे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे रोखून म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


हेही वाचा : दानवे म्हणतात नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रस्ताव सादर करणार, मुख्यमंत्री म्हणाले मी…


 

First Published on: September 17, 2021 1:09 PM
Exit mobile version