कार चालवण्याच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर लगावला टोला

कार चालवण्याच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर लगावला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (सोमवारी) एक सूचक वक्तव्य केले की, ‘राज्याचे माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे. खड्डे आणि अडचणी मध्ये-मध्ये येत आहेत. पण याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही.’ मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, ‘मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार खूप चांगली चालवतात हे मी पाहिले आहे. परंतु ज्यावेळी कार चालवत असतात त्यादरम्यान सर्व ट्रॅफिक थांबलेले असते. जेव्हा ट्रॅफिक चालू असते तेव्हा गाडी स्मूथली चाललेली असते. याप्रमाणे सरकार चालवता येत नाही. सरकार ट्रॅफिक सुरुच असते. त्यामुळे जनता त्यासंदर्भात बरोबर उत्तर देत आहे.’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या विद्यामाने ३२ व्या राज्य रस्त्या सुरक्षा महिन्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुचक वक्तव्य केले. म्हणाले की, ‘मी सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. खड्डे आणि अडचणी मध्ये-मध्ये येत आहेत, पण याचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. माझ्या हातात राज्याचे स्टेअरिंग भक्कम आहे. कार आणि सरकार हे दोन्ही व्यवस्थित सुरू आहे. यामध्ये पुढे आणि मागे कोण बसले आहे हे महत्त्वाचे नाही. दोन्ही सुरुळीत सुरू आहे. सर्वजण एकत्र मिळून काम करत आहोत.’


हेही वाचा – शिवसेना भाजपला म्हणतेय, ‘चला हवा येऊ द्या’!


 

First Published on: January 19, 2021 10:29 AM
Exit mobile version