दरेकरांवर गुन्हा दाखल करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

दरेकरांवर गुन्हा दाखल करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

दरेकरांवर गुन्हा दाखल करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सूडभावनेतून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. दरेकरांवर गुन्हा दाखल करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु आमचा आवाज बुलंद राहील असे देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले आहे. मुंबई बँकमध्ये मजूर म्हणून निवडणूक लढवली असल्याने दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकरांनी फसवणूक करुन निवडणूक लढवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. दरेकरांवरील कारवाई षडयंत्र रचून करण्यात आली असून आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच फडणवीस म्हणाले की, गुन्हा दाखल करण्याबाबत मी यापूर्वी सांगितले होते. मजूर संस्थेचे अध्यक्ष होते म्हणून गुन्हा असा दाखल केला आहे. पण या महाराष्ट्रात अशी कोणतीही मजूर संस्था काढा ज्याचे अध्यक्ष आमदार आणि खासदार आहेत. कुठल्याही बँकेमध्ये मजूर संस्थेतून निवडून आलेल्या उमेदवाराला पाहिजे तर ते पाहिले तर तो कोणत्यातरी राजकीय पक्षाचा नेता आहेत. अजित पवारसुद्धा म्हणाले होते की, या सभागृहातील अनेक नेते मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत अशी आठवण यावेळी फडणवीसांनी करुन दिली आहे.

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाई – फडणवीस

सूडाच्या भावनेतून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. आम्ही न्यायालयात जाऊ पण असे कधी घडले नव्हते विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. आम्ही घाबरत नाही तुम्ही कारवाई करा पण काही हरकत नाही आहे. प्रवीण दरेकरांवर कारवाई करुन आमचा आवाज दाबू शकाल असे राज्य सरकारला वाटत असेल तर तुम्ही दाबू शकणार नाही. आमचा आवाज बुलंद राहील. आम्ही हिशोब मांडू आणि आजपासून आम्ही राज्य सरकारला प्रत्येक ठिकाणी मंजूर संस्थेवर कोणते अध्यक्ष आहेत. याची यादी देऊ आणि राज्य सरकार काय कारवाई करत आहे. हे पाहून आम्ही या सरकारच्या विरोधात न्यायालयात जाऊ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


हेही वाचा : मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल, बोगस मजूर प्रकरणात होणार कारवाई

First Published on: March 15, 2022 11:38 AM
Exit mobile version