मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल, बोगस मजूर प्रकरणात होणार कारवाई

pravin darekar mumbai bank

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील मजूर घोटाळा प्रकरणी दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे. फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान षडयंत्र रचून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याला कायद्याने उत्तर देऊ असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत म्हटलं होते की, पुढील दोन दिवसांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सोमवारी दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वाद निर्माण होणार आहे. फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याच पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये मुंबई बँकेची शाखा आहे. प्रवीण दरेकर हे मजूर नसताना मजूर म्हणून भासवले आणि निवडणूक लढवली याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

षडयंत्र करुन गुन्हा दाखल केला – दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, विविध मार्गाने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला पंरतु कोणत्याही मार्गाने गुन्हा दाखल करता आला नाही. म्हणून जिथे राजीनामा दिला आहे. त्याच ठिकाणी पुन्हा जोरजबरदस्तीने गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर काही हरकत नाही. मला काही कल्पना नाही आहे. अधिकाऱ्यांवर जोर जबरदस्ती करुन गुन्हा दाखल केला असल्याचे दिसत आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला असेल तर दाद मागू असे दरेकर म्हणाले.

त्या संदर्भात नोंदणी अथॉरिटी असते सहकार खाते असते त्यांनी नोटीस दिल्यानंतर राजीनामा दिला आहे. या संदर्भात रितसर उत्तर देण्यात येईल. माहिती घेऊन उत्तर देऊ. १०० टक्के या संदर्भात सोमवारी फडणवीसांनी जाणीव करुन दिली होती. यानंतर सोमवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लोकांना बोलवले होते. त्यांना जबरदस्तीने गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये सीपी पांडेंना टास्क दिला आहे. टास्क पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम होता. त्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला असावा त्याचे उत्तर न्यायालयात देणार असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले आहे.

न्यायालयात दाद मागणार

न्यायालयात दाद मागितली जाईल विधिमंडळाचे अधिवेशन आहे. सभापतींना विनंती करुन निश्चित भूमिका मांडणार असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. हे मोठं षडयंत्र आहे. विधिमंडळात गिरीश महाजनांच्या बाबत सर्व यंत्रणा वापरुन गुन्हा दाखल करायचा याचे षडयंत्र रचले तशाच प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर बाजू आहेत. त्यामुळे कायद्याने दाद मांगू, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे परंतु राज्य सरकारला घाई झाली आहे. त्यामुळे त्यावर नीट उत्तर देऊ असे प्रवीण देरकर म्हणाले आहेत.


हेही वाचा : Maharashtra SSC Exams 2022: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, १६ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार