पुण्यात बोलीभाषांचे साहित्य संमेलन

पुण्यात बोलीभाषांचे साहित्य संमेलन

बोलीभाषांचे संवर्धन आणि समृद्धीसाठी राज्य साहित्य, संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुण्यात येत्या २५ नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचा कार्यक्रम पुण्यातील श्री वर्धमान प्रतिष्ठानमध्ये हे संमेलन होणार आहे. या बोलीभाषांच्या साहित्य संमेलनामध्ये अहिराणी, कोकणी, गोंड, माडी, वऱ्हाडी आदि भाषांचे साहित्यिक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

राज्यात ९४ बोलीभाषांचा समावेश

राज्यात एकूण ९४ बोलीभाषांचा समावेश आहे. या भाषांपैकी ५२ बोलीभाषांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी हातभार लावण्यात आला आहे. चांदा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेसह अन्य विदर्भीय बोलीभाषांचा देखील समावेश या संमेलनात करण्यात येणार आहे. या भाषांवर झाडीबोली आणि अन्य विदर्भीय बोलीभाषा यावर प्रा. डॉ. हरिश्चंद्र बोरकर आणि प्रा. ना. गो. थुटे बोलणार आहेत. तसेच कोकण बोलीचा राष्ट्रभक्ती प्रेरक इतिहास प्रा. विनय मडगावकर बोलणार असून डॉ. रमेश सूर्यवंशी अहिराणी बोलीभाषेतील राष्ट्रीय
अविष्कार यावर मार्गदर्शन करणार आहेत.

कोकणी, गोंड, माडी, अहिराणी, वऱ्हाडी या भाषांचा गोडवा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याकरता या समंलेनात हा बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे. या भाषांचा सध्याच्या पिढीला मोठा फायदा होईल असा विश्वास संमेलनाचे अध्यक्ष आणि पुणे विभागाचे वनसंक्षक रंगनाथ नाईकडे यांनी व्यक्त केला आहे.


वाचा – साहित्य संमेलन हा टाइमपास कार्यक्रम – सचिन कुंडलकर

First Published on: November 20, 2018 10:24 AM
Exit mobile version