दिवा जिल्हा रुग्णालयाला मिळणार 58 कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली मान्यता

दिवा जिल्हा रुग्णालयाला मिळणार 58 कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली मान्यता

राज्याच्या नगर विकास विभागाकडून दिवा येथे जिल्हा रुग्णालय उभारणीकरिता 58 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधी करिता मंजुरी दिली आहे.

राज्याच्या नगर विकास विभागाकडून दिवा येथे जिल्हा रुग्णालय उभारणीकरिता 58 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा रुग्णालयाकरिता जागा भुसंपादन करण्याकरिता राज्याच्या नगर विकास विभागाकडून हा निधी देण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीचे काम वेगाने व्हावे, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नगरविकास विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधी करिता मंजुरी दिली आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : “तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील…”, कुस्तीपटूंसाठी राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात अनेक विकासकामे वेगाने मार्गी लागत आहे. मतदार संघातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, जलजीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मार्गी लावणे, अमृत योजनेद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागांचा पाणी प्रश्न सोडविणे, मतदार संघातील प्राचीन मंदिरांचा परिसर सुशोभीकरण करणे, भुयारी गटार योजना, नाट्यगृह यांसारखे अनेक विकासकामे लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुराव्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक सुविधा नव्याने उभ्या राहत आहेत. मतदार संघात पायाभूत सुविधांबरोबरच व्यवस्थेचे बळकटीकरण कशा पद्धतीने होईल यासाठीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विशेष प्रयत्न करत आहेत.

खासदार डॉ. शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अंबरनाथ शहरात शासकीय मेडिकल महाविद्यालय तसेच दोन प्रशस्त रुग्णालय, उल्हासनगर येथील कामगार रुग्णालयाचे नूतनीकरण, डोंबिवली शहरात डायलिसिस केंद्र, कळवा येथील शासकीय रुग्णालयात माफकदरात सिटी स्कॅन आणि एमआरआय आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर कळवा येथील रुग्णालयावर येणारा ताण पाहता दिवा येथे स्वतंत्र शासकीय रुग्णालय उभे राहावे, याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने राज्याच्या नगरविकास विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू होता. या रुग्णालयाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला होता. खासदार डॉ. शिंदे यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालय उभारणीसाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनाकरिता ५८ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी दिली आहे.

महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत ठाणे महानगरपालिकेला हा निधी देण्यात आला आहे. यामुळे लवकरच दिवा येथे एक प्रशस्त रुग्णालय उभे राहणार असून दिवा तसेच आसपासच्या शहरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

First Published on: May 31, 2023 7:35 PM
Exit mobile version