Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Raj Thackeray : "तर 'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील...", कुस्तीपटूंसाठी राज ठाकरेंचे...

Raj Thackeray : “तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील…”, कुस्तीपटूंसाठी राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Subscribe

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लक्ष वेधण्यात आले आहे. त्यांनी या प्रकरणी महिला कुस्तीपटूंच्याबाबत आवाज उठवत भूमिका मांडली आहे.

गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटू न्याय मिळवा यासाठी आंदोलनाला बसल्या आहेत. भाजपचे बिहारचे खासदार रोज बृजभूषण सिंह यांनी अत्याचार केला असल्याचा आरोप कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्यावर तात्काळ कारवाई करत त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून या आंदोलक कुस्तीपटूंकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – Swara Bhasker: ‘बलात्काराच्या आरोपीला वाचवत…’, कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत

- Advertisement -

परंतु केंद्र सरकारने याबाबत अद्यापही कोणतेही पाऊल न उचलल्याने काल मंगळवारी (ता. 30 मे) या आंदोलक महिला कुस्तीपटूंनी मेहनतीने मिळवलेली पदके गंगेमध्ये वाहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शेतकरी नेत्यांनी या महिला कुस्तीपटूंची समजूत काढल्याने त्यांच्याकडून हा निर्णय मागे घेण्यात आला. पण आता या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लक्ष वेधण्यात आले आहे. त्यांनी या प्रकरणी महिला कुस्तीपटूंच्याबाबत आवाज उठवत भूमिका मांडली आहे.

भविष्यात जर का खेळाडूंमध्ये आपल्या सरकारला आपल्या दुःखाची परवा नाही असे चित्र उभे राहिले तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील, असे या पत्रातून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. तर ज्यांचा गौरव आपण देश की बेटियाँ असा करत आलो आहोत त्यांची फरपट थांबवा, अशी मागणी देखील त्यांनी या पत्रामधून केली आहे

- Advertisement -

“सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.” असे लिहित त्यांनी हे ट्वीट #WrestlingProtest #WrestlersProtest @Phogat_Vinesh @BajrangPunia @SakshiMalik यांना टॅग केले आहे.

राज ठाकरे हे नेहमीच पत्राच्या माध्यमातून विविध विषय मांडत असतात. एखाद्या गोष्टीची मागणी करण्यासाठी देखील ते पत्राचाच वापर करत असतात. त्यामुळे राज ठाकरे यांचे पत्र आणि त्याबाबत निर्णय होणार नाही, असे क्वचितच झालेले आहे. म्हणूनच राज ठाकरे यांच्या पत्रामुळे तरी केंद्र सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयाकडे गंभीरतेने पाहून कोणता निर्णय घेतात की नाही? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या महिन्यात 23 एप्रिलला सुरू झालेले महिला कुस्तीपटूंचे आंदोलन आजही सुरूच आहे. रविवारी (ता. 28 मे) आंदोलक कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर या आंदोलनाला आक्रमक रूप प्राप्त झालेले आहे.

- Advertisment -