दिवेआगर सुवर्ण गणेशाचा आज प्रकट दिन सोहळा

दिवेआगर सुवर्ण गणेशाचा आज प्रकट दिन सोहळा

रायगड जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धा स्थळांपैकी दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाचा २३ वा प्रकट दिन सोहळा शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता विश्वस्त भालचंद्र चोगले सपत्नीक गणेशाची महापूजा करणार असून ७.३० वाजता ब्रह्मवृंदाची आवर्तने, १० वाजता राजेंद्र मांडेलवाल (मुंबई) यांचे कीर्तन, दुपारी ४ वाजता हळदीकुंकू, तर १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि १२ वाजता महाप्रसाद होणार आहे.

तत्पूर्वी, १७ नोव्हेंबर १९९७ साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कै. द्रौपदीबाई पाटील यांच्या नारळ-सुपारीच्या बागेमध्ये सुवर्ण गणेश प्रकट झाले. मात्र २०१४ मध्ये सुवर्ण गणेशाची मूर्ती दरोडेखोरांनी रक्तरंजित दरोडा टाकून चोरून नेली. पोलिसांनी चोरट्यांना पकडले असले तरी ऐवज पुन्हा मिळविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे.

First Published on: November 15, 2019 1:56 AM
Exit mobile version