डॉल्बी बंदीवर पुनर्विचार सुरु – चंद्रकांत पाटील

डॉल्बी बंदीवर पुनर्विचार सुरु – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बीवर मुंबई हायकोर्टाने बंदी घातली होती. मात्र, असे असताना देखील राज्यातील अनेक शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट सुरू असतो. यामुळे आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे ‘यंदा जर या निर्णयाविरोधात डॉल्बी लावली तर गुन्हे दाखल करावे लागतील. कोल्हापूरमध्ये आम्ही जनजागृतीतून हा प्रश्न सोडविला आहे. विसर्जनाला रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सध्या केली जात आहे. याबाबत माझे बोलणे आणि कायदेविषयक चर्चा सुरु असून मंडळांना समाधान वाटेल, असा मार्ग आपण काढू’, असा विश्वास पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तरुण मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले असून मंडळाला ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १५६ मंडळांपैकी ९८ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून ट्रस्टच्या वतीने एकूण १२ लाख ६ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली.

समाजाच्या विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढलेला असताना गणेशोत्सवाप्रमाणे इतरही उत्सवात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. यामुळे उत्सवात आणि कामात सुसंस्कृतपणा वाढेल. गणपतीच्या निमित्ताने एकत्र आलेला कार्यकर्त्यांचा गट असून त्या गटाने वर्षभर कार्य करीत अडचणी सोडविण्यास मदत केल्यास पुण्यातील अनेक प्रश्न सुटतील. सध्या लोकांची पोटाची भूक भागत चालली आहे. आता मनाची आणि बुद्धीची भूक वाढत आहे. त्यामुळे व्याख्याने, गाणी, स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम मंडळांनी वर्षभर राबवायला हवे आहेत.


हेही वाचा – चंद्रकांत पाटीलांनी केली पूर परिस्थितीची पाहणी


 

First Published on: August 20, 2019 10:32 PM
Exit mobile version