‘कोरोनामुळे मुंबईपेक्षा डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईची स्थिती चिंताजनक’

‘कोरोनामुळे मुंबईपेक्षा डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईची स्थिती चिंताजनक’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

महाराष्ट्रात मुंबईपेक्षाही डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. तसेच देशात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोना स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचं पाळणं करणं, आरोग्य सेवा वाढवणं हे सगळं अत्यावश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार औरंगाबादच्या परिषदेत म्हणाले.

सध्या पावसाळ्याच्या दृष्टीने आणखी काळजी घेणं गरजेचं आहे. राज्यात मृत्यूदर कसा कमी करता येईल याकडे सरकारचं लक्ष्य असल्याचं शरद पवार यांनी या परिषदेत स्पष्ट केलं. तसंच ते पुढे औरंगाबादेतील कोरोना परिस्थितीविषयी बोलताना म्हणाले की, औरंगाबादमध्ये बेड्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. औरंगाबाद रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.

कॅप्टन एकाच ठिकाणी असावा म्हणून मुख्यमंत्री मुंबईत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर जात नाहीत असे आरोप काही दिवस सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहेत. यावर खासदार शरद पवार यांनी पाठराखण केली आहे. कॅप्टन एकाच ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे म्हणून मुख्यमंत्री मुंबईत आहेत. एकाच ठिकाणी बसून मुख्यमंत्री कोरोना परिस्थितीतचा आढावा घेतात आणि सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात, असं शरद पवार म्हणाले.


हेही वाचा – अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल – राजेश टोपे


 

First Published on: July 25, 2020 3:18 PM
Exit mobile version