उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात ऊर्जा विभागातील योजनांमध्ये योग्य बदल करावेत, डॉ. नितीन राऊतांचे निर्देश

उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात ऊर्जा विभागातील योजनांमध्ये योग्य बदल करावेत, डॉ. नितीन राऊतांचे निर्देश

उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात नवनवीन विकासक येत असून या भागाचा विकास झपाट्याने होत आहे. हा विकास लक्षात घेऊन उर्जा विभागाने त्यानुसार आपल्या योजनांमध्ये योग्य बदल करावेत असे निर्देश ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.

आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत व त्यांच्या मतदारसंघातील उर्जा विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत उर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी हे निर्देश दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून महावितरण, महापारेषण व संबंधित क्षेत्रीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

गायकवाड पाडा येथील अतिउच्चदाब उपकेंउद्रासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पालेगाव औद्योगिक वसाहतीतील इएचव्ही उपकेंद्रासाठी महापारेषण व औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात समन्वय सुरू असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तर मोरिवली येथील इचव्हीच्या उपकेंद्राची क्षमतावाढ करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

उल्हासनगर व अंबरनाथ परिसरात अखंडित वीजपुरवठा व जुनी वीज वितरण यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी ‘सुधारित वितरण क्षेत्र योजने’तून (आरडीएसएस) आराखडा सादर करण्यात आला आहे. महावितरणच्या उल्हासनगर विभाग एक अंतर्गत १३३ कोटी तर उल्हासनगर विभाग दोन अंतर्गत २९२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावित आराखडा सादर करण्यात आला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


हेही वाचा : Apple चा सर्वात स्वस्त iPhone मार्चमध्ये लॉंच होण्याची शक्यता, जाणून घ्या फीचर्स


 

First Published on: January 12, 2022 11:06 PM
Exit mobile version