खड्ड्यांचा फटका पुणे महापालिकेला; अपघाती मृत्यूप्रकरणात 16 लाख देण्याचे कोर्टाचे आदेश

खड्ड्यांचा फटका पुणे महापालिकेला; अपघाती मृत्यूप्रकरणात 16 लाख देण्याचे कोर्टाचे आदेश

छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी जनतेमध्ये आपल्याबद्दल अपप्रचार करुन बदनामी केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात मे 2021 मध्ये अवमान याचिका दाखल केली होती.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी चालवताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच पुणे महापालिकेला या खड्ड्यांचा मोठा फटका बसला आहे. एका २० वर्षीय तरुणाचा खड्ड्यामुळे दुचाकी घसरून अपघाती मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूनंतर दिवाणी न्यायालयाने त्याच्या कुटुंबीयांना 16 लाख रुपये 16 टक्के व्याजासह नुकसान रुपये देण्याचा आदेश पुणे महानगरपालिकेला दिले. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.एस.शिंदे यांनी हा निकाल दिला. (Due Pothole Accident Civil Court Pune Municipal Compensation To Given To Family Of Youth Died)

मिळालेल्या माहितीनुसार, यश दिनेश सोनी (20) यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. यशच्या अपघातानंतर त्यांचे वडील दिनेश फुलचंद सोनी (52) यांनी पुणे महानगरपालिके विरोधात दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करत 1 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती.

नेमके प्रकरण काय?

26 जून 2016 रोजी यश हा त्याच्या दुचाकीवरून संचेती हॉस्पिटल चौकाकडून कामगार पुतळा चौकाकडे जात होता. त्यावेळी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवाजावर आले असता त्याची दुचाकी एका मोठ्या खड्ड्यामुळे घसरली. अपघातानंतर घसरत गेल्याने डिव्हायडरजवळ असलेला दोन फुटांचा अर्धवट कापलेला लोखंडी रॉड यश यांच्या छातीला लागला. त्यामुळे या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

यशच्या मृत्यूनंतर महापालिकेची सारवासारव

दरम्यान, दिवाणी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत महानगरपालिकेने सोनी यांच्या कुटुंबायांना 16 लाख 20 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 15 हजार रुपये अंत्यविधीचा खर्च 16 टक्के व्याजासह दावा दाखल केल्याच्या तारखेपासून द्यावा, असा आदेश दिला. न्यायालयाच्या या आदेशामुळे सोनी यांच्या कुटुंबायांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सार्वजनिक रस्त्यांची योग्य देखभाल करून रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरल्याने अर्धवट कापलेल्या लोखंडी रॉडमुळे यशचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असा दावा सोनी यांनी केला होता.


हेही वाचा – पंकजा मुंडेंचे भाजपा अध्यक्षांसमोर अवघ्या 30 सेकंदांचे भाषण, म्हणाल्या…

First Published on: January 3, 2023 8:13 AM
Exit mobile version