दूषित पाण्यामुळे मेळघाटात ५० जणांची प्रकृती खालावली, रुग्णांची योग्य काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दूषित पाण्यामुळे मेळघाटात ५० जणांची प्रकृती खालावली, रुग्णांची योग्य काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात खुल्या विहिरीतील दुषित पाणी पिल्यामुळे 50 जणांची प्रकृती खालावली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णांपैकी तीघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. ही घटना समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत रुग्णांची काळजी घेण्याचे आदेश दिले.

यावेली रुग्णांवर तातडीचे उमचार करायची गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखळ करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या 50 जणांतील प्रकृती चिंताजनक असून उर्वरित लोकांवर उपचार सुरू आहेत, अशि माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिली. दरम्यान सर्व रुग्णांना योग्य उपचार द्या आणि मृतांचा आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गढूळ पाणी पिल्यामुळे अनेक आजार –

मेळघाटात पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. मेळघाट, चिखलधरा लगतच्या गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, लोकप्रतीनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. नागरीकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असून हे पाणी पिल्यामुळे गावात अनेकांना खोकला, पोट दुखी, सारखे आजार झाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारवर नवनीत राणांचा आरोप –

गावाबाहेरच्या विहिरीतील घाण पाणी पिल्याने लोके आजारी पडले आहेत. त्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचा वीज पुरवठा कापल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. मागच्या सरकारने आदेश दिल्याने वीज पुरवठा 15 दिवस आधी कापण्यात आला. ज्या विभागाच्या चुकीमुळे ही घटना घडली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. उघड्या विहिरीवरून हे लोक अस्वच्छ पाणी भरत होते तेव्हा प्रशासन काय करत होते याचे उत्तर द्यावे लागेल. येवढी मोठी घटना घडूनही संबंधित विभागाचे अधिकारी वेळेवर पोहोचले नाहीत, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे  दुर्लक्ष केल्याचा आरोप –

खासदार नवनीत राणा यांच्याकडूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना केवळ निवडणुकीच्या वेळेसच मेळघाट आठवतो का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. नवनीत राणा सोबतच जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे सुद्धा मेळघाटच्या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

First Published on: July 9, 2022 3:38 PM
Exit mobile version