अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सोमवारी रत्नागिरीतील शाळांना सुट्टी जाहीर

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सोमवारी रत्नागिरीतील शाळांना सुट्टी जाहीर

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सोमवारी रत्नागिरीतील शाळांना सुट्टी जाहीर

सध्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. शनिवारी रात्री पासून पावसाने जो काही जोर धरला आहे तो सद्य स्थितीत चालू आहे. त्यामुळे सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड, रोहा आणि नागोठाणे गावांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दि ५ रोजी हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिनांक ५ ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील या अतिमुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. कोकणातील कुंडलिका, सावित्री आणि अंबा नद्यांनी शुक्रवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे सखल भागात राहण्याची तारांबळ उडाली होती. तसेच रविवारी कोकण रेल्वे मार्गावर एक मोठा अपघात टळला. पेण रेल्वे स्थानकात दुष्मी रेल्वे गेट परिसरात भुस्खळन झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. या दरम्यान तिथून राजधानी एक्स्प्रेस जात होती. पण गाडी चालकामुळे हा मोठा अपघात होता होता टळला.

गेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात सरासरी २५२.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच १ जूनपासून रविवार अखेर एकूण सरासरी ३०२६.७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याची सरासरी २५२.४० मिलिमीटर इतकी आहे. रविवारी सकाळ ते आता पर्यंत एकूण पर्जन्यमान्य ४०३८.४० मिलिमीटर इतके आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी ९६.३१ टक्केइतकीआहे.

First Published on: August 4, 2019 7:33 PM
Exit mobile version