कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, पंचगंगेची पातळी २५ फुटांवर

कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, पंचगंगेची पातळी २५ फुटांवर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. एका रात्रीत पंचगंगेची पाणी पातळी ८ फुटांनी वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही २५ फुटांवर गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशार दिला आहे. जिल्ह्यातील 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, एनडीआरएफची पथके दाखल होणार असून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. एका रात्री पंचगंगेची पाणी पातळी तब्बल 7 फुटांनी वाढली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 24 फुटांचवर पोहोचली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातले सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काल दिवसभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सध्याही पावसाची संततधार सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील पश्चिमेकडचे जे तालुके आहेत, त्याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सगळ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. मुंबई आणि राज्यातील इतर शहरात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असल्याने तातडीने आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व विभाग अलर्ट असून समस्येला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. सगळ्यांनी आपआपली तयारी काय काय़ आहे हे बैठकीत सांगितली आहे. याशिवाय ज्या काही इजन्सी आहेत त्यांच्या टीम देखील वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज ठेवल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांचे नुकसान होणार नाही. दरड कोसळून दुर्घटनेची ठिकाणं ट्रॅक केली आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासह, काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

First Published on: July 5, 2022 3:55 PM
Exit mobile version