NEET : ‘त्या’ प्रकारामुळे विद्यार्थिंनींना वाटते भीती

NEET :  ‘त्या’ प्रकारामुळे विद्यार्थिंनींना वाटते भीती

मुंबई | नीट (NEET) परीक्षेदरम्यान विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना उलटे कपडे (Clothes) घालून परीक्षा देण्यास सांगितले तर, विद्यार्थिंनींना अंतर्वस्त्रेही उलटे घालून परीक्षा द्यायाल लावण्याचा लाजीरवाणा प्रकार महाराष्ट्रातील सांगलीत घडला होता. या प्रकारनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त करत एनटीएकडे (NTA) तक्रार केली आहे. यानंतर विद्यार्थीनींना भीती सतावू लागली की, ज्या ठिकाणी विद्यार्थींनी कपडे बदलले, ती जागा किती सुरक्षित होती? कोणी आपले फोटो तर काढले नाही ना? कुणी व्हिडीओ रेकॉर्डिंग तर केली नाही ना?, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. या प्रकरणामुळे विद्यार्थिंनीचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठीच उलटे कपडे घायला सांगितले.

या प्रकरणाच चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विद्यार्थिंनी आणि त्यांच्या पालक करत आहेत. यंदा नीट परीक्षा रविवारी (ता. ७) पार पडली. या देशभरातील ४ हजार केंद्रावर २ दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षा केंद्रावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ड्रेस कोड बंधनकारक केला. यावेळी ड्रेस कोड न घातलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर शेवटच्या क्षणी ड्रेससाठी धावपळ करावी लागली.

हेही वाचा – NEET : विद्यार्थिंनींना खुल्या मैदानात बदलावे लागले कपडे; काय आहे संपूर्ण प्रकार

सांगली परीक्षा केंद्रावर नेमका काय घडला प्रकार

“सांगली परीक्षा केंद्र (कस्तुरबा वालचंद कॉलेज) येथे विद्यार्थिंनीना कुर्ते आणि अंतर्वस्त्रेही काढून उलटे घालण्यास सांगितले. तसेच केस मोकळे सोडण्यासही सांगण्यात आले होते. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना सांगितला. हा प्रकार नीटसारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिंनीना अशी वागणूक दिली जाते हे योग्य नाही, या संपूर्ण प्रकाराची तक्रार डॉक्टर दांम्पत्यांनी टीओआयकडे केली आहे.”

 

 

First Published on: May 12, 2023 4:21 PM
Exit mobile version