कोयनानगर येथे भूकंपाचा सौम्य धक्का

कोयनानगर येथे भूकंपाचा सौम्य धक्का

सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे मंगळवारी रात्री ९:४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तिव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १२.८ किलोमीटरवर असल्याची माहिती समोर आली आहे.

या परिसरात जाणवला भूकंपाचा धक्का

कोयनानगर येथे मंगळवारी रात्री ९:४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. हा धक्का कोयना तसेच पाटण परिसरात जाणवल्याचे दिसून आले, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे. दरम्यान, कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका कायम सुरूच असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा धक्का कमी तिव्रतेचा असल्याने नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

First Published on: July 10, 2019 11:41 AM
Exit mobile version