नवाब मलिकांचे दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी व्यवहार, ईडीचा कोर्टात दावा

नवाब मलिकांचे दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी व्यवहार, ईडीचा कोर्टात दावा

संग्रहित छायाचित्र

मुंबई – ईडीने बुधवारी विशेष न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले आमदार नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरशी व्यवहार होते. तिच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगितले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएसजी अनिल सिंग यांनी ईडीतर्फे मलिकच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान हा युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी न्यायालयाला अर्ज फेटाळण्याची विनंती केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मलिक (63) यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित  व्यावहाराच्या चौकशीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री असलेल्या मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली होती. या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली होती. जमीन व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण असून टेरर फंडिंग आणि मनी लाँडरिंगचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. हे सर्व आरोप मलिक यांनी अमान्य केले असून ईडीची कारवाईच बेकायदेशील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मलिक यांनी अटकेविरोधात मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावले होते. मात्र, तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळेच ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
First Published on: September 15, 2022 10:51 AM
Exit mobile version