Anil Deshmukh : अनिल देशमुख सर्च मोहिमेत ED ने मागितली CBI ची मदत

Anil Deshmukh : अनिल देशमुख सर्च मोहिमेत ED ने मागितली CBI ची मदत

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, हायकोर्टाने १२ नोव्हेंबरपर्यंत सुनावली ईडी कोठडी

महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री यांच्या शोधात वारंवार समज बजावूनही अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. अखेर या प्रकरणात तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचलनालयाने अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयची मदत घ्यायचे ठरवले आहे. याआधीच ईडीने अनिल देशमुख यांच्या वारंवार गैरहजेरीमुळे लूक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. अनिल देशमुख यांच्यासोबतच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या शोधात ईडीकडून सर्च मोहीम सुरू आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा ईडीकडून या दोघांनाही समन्स बजावण्यात आले आहेत.

आतापर्यंत ईडीकडून अनिल देशमुख यांना पाचवेळा तसेच त्यांचा मुलगा ऋषीकेश देशमुखला दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी ईडीकडे याआधीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जबाब नोंदविण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात त्यांची याचिका न्यायप्रविष्ट असल्यानेच वारंवार ईडीने समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत. आतापर्यंत अनेकदा वकिलांकडून ईडीला पत्र पाठवून हजर राहण्याची परवानगी अनिल देशमुख यांनी मागितली होती. पण प्रत्यक्षात मात्र ते हजर राहिलेच नाहीत. आतापर्यंत या संपुर्ण प्रकरणात अनिल देशमुख यांची विविध ठिकाणची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

या संपुर्ण प्रकरणात याआधीच अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्याचप्रमाणे अनिल देशमुखय यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली होती. सीबीआयचा प्राथमिक अहवाल देशमुखांकडूनच लीक झाल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणात गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांनाही सीबीआयने अटक केली. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांची नावेही या संपुर्ण प्रकरणात समोर आली आहेत. तसेच सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांनाही दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. या संपुर्ण प्रकरणात अनिल देशमुख आणि तिवारी यांच्यातील संभाषणाच्या पुराव्याच्या आधारावरच अटक करण्यात आली होती.


 

First Published on: September 13, 2021 1:38 PM
Exit mobile version