खडसेंचं डोकं फिरल्यामुळे वाट्टेल तसं बरळताहेत, गिरीश महाजनांचा पलटवार

खडसेंचं डोकं फिरल्यामुळे वाट्टेल तसं बरळताहेत, गिरीश महाजनांचा पलटवार

खडसेंचं डोकं फिरल्यामुळे वाट्टेल तसं बरळताहेत, गिरीश महाजनांचा पलटवार

जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगल आहे. दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक वाद विकोपाला पोहचताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांना कोरोनाची लागण दोन वेळा झाली आहे. यावरुन या नेत्यांमध्ये टीका टीप्पणी होत आहेत. मोक्का लागण्याच्या भीतीने महाजनांना कोरोनाची लागण झाली असल्याचे विधान खडसेंनी केलं होते. यावर खडसेंना ठाण्याला दाखवायला हवे असे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले होते. तर यावर आता पुन्हा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जुंपली आहे. खडसेंचे डोक फिरले असल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे. गिरीश महाजनांना पुण्याती बुधवार पेठेत पाठवायला हवे असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होते. यावर गिरीश महाजनांनी पलटवार केला आहे. खडसेंच डोकं फिरल्यामुळे वाट्टेल तसं बरळत आहेत. खोटेनाटे गुन्हे दाखल करुन पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग खडसे करत आहेत. असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, महाजन यांच्यावर मोक्काची कारवाई होणार असल्यामुळे त्यांना कोरोना झाला. मात्र यावर महाजन यांनी प्रत्युत्तर देताना खडसेंना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवे असे विधान केले होते. यावर पुन्हा खडसेंकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नाथाभाऊंना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. परंतु गिरीश महाजनांना पुण्यातील बुधवार पेठेत पाठवायला पाहिजे. एकनाथ खडसे

विकृत मनोवृत्ती असल्यामुळे दुसरी कल्पना 

गिरीश महाजनांना कोरोना झाला दुसऱ्यांदा त्यांना कोरोना झाला आहे. त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नाथाभाऊंना ठाण्याला पाठवावे असे वक्तव्य केलं आहे. त्यावर मी म्हणालो की, गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत पाठवावे कारण बुधवार पेठेत दगडुशेठ हलवाई गणपती आहे. गणपतीचे दर्शन घेतल्यावर त्यांना सुबुद्धी देईल अशी आपेक्षा होती. परंतु विकृत मनोवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्या मनात दुसरी भावना आली होती. त्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे, जशी दृष्टी तशीच सृष्टी, माझा दृष्टीकोण साफ आहे. आज कोणी नाकारू शकत नाही की बुधवार पेठेत गणपीतीचे मंदिर आहे आणि तो गणपती नवसाला पावणार आहे. त्यामुळे दगडू शेठ हलवाई गणपती महाजनांना नवसाला पावेल अशी मी प्रार्थना करतो असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.


हेही वाचा : भाजपमध्ये असताना चांगला अन् राष्ट्रवादीत गेल्यावर १ वर्षात ईडी लावता, एकनाथ खडसेंचा खोचक सवाल

First Published on: January 10, 2022 1:05 PM
Exit mobile version