एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या पत्राची चर्चा, नेमकं काय आहे पत्रात?

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या पत्राची चर्चा, नेमकं काय आहे पत्रात?

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या बंडाचा परिणाम थेट महाविकास आघाडीवर होणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४५ आमदार आहेत, असं सांगितले जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्राबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता या दोघांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

संजय राऊतांच्या पत्रात काय?

फेब्रुवारी महिन्यात संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात राऊत यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करा अन्यथा तुमची अवस्था लालू प्रसाद यादव यांच्यासारखी करू असे म्हटले होते. ही धमकी देण्यासाठी काहीजण भेटले होते, असा दावाही राऊत यांनी केला होता. तसेच सरकार पाडण्यासाठी नकार दिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, असेही राऊत म्हणाले होते. मात्र, राऊतांच्या या लेटब बॉम्बची मोठी चर्चा झाली होती. त्यामुळे सध्या राऊत हे ईडीच्या रडारवर आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या पत्राची चर्चा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहित खळबळ उडवून दिली होती. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने आता भाजपसोबत जुळवून घ्यावे अशी विनंती केली होती. त्याचप्रमाणे पत्र लिहिण्याआधी केंद्रीय तपास यंत्रणांनी सरनाईक यांची चौकशी केली होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार असल्याने ते स्वतंत्र्य गट स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांनीही माझ्यासोबत ४० आमदार असून हा शिवसेनाचा अधिकृत गट असल्याचा दावा केला आहे. यामुळे शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिंदे सरकार स्थापन होणार की मविआला झटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा :माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार, माझाच गट अधिकृत – एकनाथ शिंदे


 

First Published on: June 22, 2022 9:00 AM
Exit mobile version