राणेंच्या विधानात तथ्य नाही, एकनाथ शिंदेंनी खोडून काढला नारायण राणेंचा दावा

राणेंच्या विधानात तथ्य नाही, एकनाथ शिंदेंनी खोडून काढला नारायण राणेंचा दावा

राणेंच्या विधानात तथ्य नाही, एकनाथ शिंदेंनी खोडून काढला नारायण राणेंचा दावा

नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही करण्यापुरते मंत्री राहिले आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावं अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. यावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यामध्ये तथ्य नाही. माझ्या विभागात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे असं म्हणण चुकीचे आहे. विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नारायण राणेंनाही उद्या एखादा मोठा निर्णय घ्यायचा असल्यास ते पंतप्रधान मोदींच्या संमतीनेच घेतील असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी नारायण राणेंचा दावा खोडून काढला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत मी माहिती घेतली आहे. राणेंनी शोध कुठून लावला हे माहित नाही. परंतु माझ्याविभागत मला निर्णय घेण्याचं संपुर्ण स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षात आणि विभागात काम करत असून मी साधानी आहे. मला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे लोकहिताचा आणि राज्याचा हिताचा निर्णय घेऊ शकलो. तसेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील यशस्वीपणे पुढे नेत आहे. यामुळे माझ्या कामात आणि माझ्या विभागात मातोश्रीचं हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे असं म्हणण चुकीचे आहे. त्यात कुठलंही तथ्य नाही असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

नारायण राणे युतीच्या काळात मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनाही माहिती आहे की, धोरणात्मक मोठे निर्णय घ्यायचे असल्यास कोणताही विभाग मुख्यमंत्र्यांचे संमतीने घेतले जातात. राणे आज केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल, पॉलिसी डिसीजन निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संमतीनेच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं आहे. ते एकप्रकारचे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकार चांगलं काम करतंय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. कोरोनाबाबत निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय आणि विकासाच्या बाबतीत निर्णय असुदेत कोरोना संकटात देखील महाविकास आघाडी विकासाच्या संदर्भातील प्रकल्प पुढे नेत आहे. कोणत्याही कामांना कात्री लावली नाही. यामुळे नारायण राणे यांच्या बोलण्यात तथ्य नाही असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

नारायण राणे काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, “एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी ते केवळ सहीपुरते आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीशिवाय एकही फाईल सही करु शकत नाहीत. त्यामुळे ते बिचारे कंटाळलेत. अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधत आहेत. एक दिवस फोन करेन आणि मार्ग दाखवेन,”


हेही वाचा :  एकनाथ शिंदे फक्त सहीपुरते मंत्री, ते शिवसेनेला कंटाळले; राणेंचं मोठं वक्तव्य


 

First Published on: August 22, 2021 1:49 PM
Exit mobile version