मंत्रिपदाच्या याद्या सोशल मीडियावर व्हायरल, एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले…

मंत्रिपदाच्या याद्या सोशल मीडियावर व्हायरल, एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले…

राज्यातील सत्ताानाट्याचा पेच संपला असून आता लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे. भाजपशासित सरकारमध्ये शिंदे गटाची काय भूमिका असणार? त्यांना कोणती खाती मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असतानाच मंत्रिपदाच्या याद्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. दरम्यान, या याद्या चुकीच्या असून यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. (Eknath Shinde tweet on ministry)

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा अॅक्शन मोडमध्ये; शिंदे गटाकडे सगळ्यांच्या नजरा

एकनाथ शिंदे यांनी आज ट्विट करत म्हटलं की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.


दरम्यान, शिंदे गटाने शिवसेनेसोबत फारकत घेतली असली तरी ते अधिकृतपणे शिवसेनेतून बाहेर पडलेले नाहीत. तसेच, तुम्ही आता तुमच्या मार्गाने जाऊ शकता असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाची पुढची भूमिका काय असणार हा पेच निर्माण झाला आहे. मात्र, मतदारसंघातील कामे हाच आमचा फोकस असणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – भाजपच्या प्रसाद लाड यांना धमकीचे फोन, सहपोलीस आयुक्तांना पत्र लिहीत व्यक्त केली भीती

ते ट्विटमध्ये म्हणाले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.


शिंदे गट गोव्यात दाखल –

अनेक अपक्ष आमदारांसह नाराज शिवसेनेचे आमदार 22 जूनपासून मुंबईपासून सुमारे 2,700 किमी अंतरावर असलेल्या गुवाहाटीत तळ ठोकून होते. आसाम सरकारने बुधवारी सांगितले की, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतर असंतुष्ट आमदार, जे गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आठवडाभरापासून थांबले आहेत, ते राज्याचे “पाहुणे” आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी संध्याकाळी गुवाहाटीहून गोव्यात  आल्यानंतर पणजीजवळील दोना पावला येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत.

First Published on: June 30, 2022 11:12 AM
Exit mobile version