शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. पक्षाने त्याला मान्यता दिली, असा दावा करत या सरकारला बाहेरून मदत करण्याची मानसिकता तयार केली होती, मात्र सत्ता बाहेर राहून चालत नाही, घटनाबाह्य सत्ताकेंद्र असणे पक्षालाही मान्य नव्हते. त्यामुळे मोदी, शहा यांनी मला सरकारमध्ये राहण्यास सांगितले. त्यानुसार मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री होण्यात कुठलाही कमीपणा मानत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.

ते पुढे म्हणाले, शिवसेना आमदारांचे बंड नव्हे तर उठाव होता. शिवसेना आमदारांची खदखद पहिल्या दोन महिन्यांत लक्षात आली होती. मी त्यावर नजर ठेवून होतो. शिवसेनच्या जोरावर बाकीचे पक्ष स्वत:चे राजकीय प्राबल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करत होते.

या सर्व अस्वस्थतेत त्यांनी उठाव केला आणि त्या उठावाला आम्ही साथ दिली. शिवसेना संपवायला कोण निघाले आहे हे बंडखोर शिवसेना आमदारांनी वारंवार सांगितले आहे. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांना हे कळत नसेल तर ईश्वरच जाणो.

First Published on: July 6, 2022 5:30 AM
Exit mobile version