विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

राज्यात महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार?, असा प्रश्न एकीकडे पडला असतानाच दुसरीकडे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे बिगुल वाजले आहेत. ही निवडणूक आगामी वर्षात ३० जानेवारीला होणार आहे. तर २ फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

विधान परिषदेच्या २ पदवीधर आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे.

विद्यमान सदस्य

डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या ५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.


हेही वाचा : अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले; महापुरुषांचा अपमान, मविआ नेत्यांना अटक अन्…


 

First Published on: December 29, 2022 9:20 PM
Exit mobile version