स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर लागल्या पाहिजेत, अजित पवारांची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर लागल्या पाहिजेत, अजित पवारांची मागणी

पुणे – राज्यात सतत राजकीय स्थित्यंतर निर्माण होत असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हायला पाहिजेत, असं राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये या निवडणुका होणं अपेक्षित होतं. मात्र, अद्यापही या निवडणुका लागलेल्या नाहीत. १० महिने उशीर झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या निवडणुका होणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले. पुण्यात आज ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – कोणतीही देवी गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही, ‘सामना’तून शिंदे गटावर टीका

अजित पवार म्हणाले, राजकीय स्थित्यंतरामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. सहकाऱ्यातल्या निवडणुका लागल्या. त्याचा निकालही लागला. पण एखादी गोष्ट न्यायवस्थेच्या पुढे असल्याने अंतिम निर्णय न्यायव्यवस्थेचा असतो. पण या सगळ्यात सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांनी आता एक निर्णय घेतला पाहिजे. फेब्रुवारी २०२२ ला पालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या पाहिजे होत्या. अद्यापही या निवडणुका लागल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लहान कार्यकर्त्यालाही काम करण्याची संधी मिळते. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था चव्हाणसाहेबांनी काढल्या होत्या. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे असं आमचं मत आहे. पण तारीख पे तारीख यामुळे कळत नाहीय काय चाललंय, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – मुख्यमंत्रीच चार महिन्यांपासून चालवतायत यात्रा कंपनी, ठाकरे गटाचे जोरदार टीकास्त्र

First Published on: November 28, 2022 10:35 AM
Exit mobile version