वीज चोरीबाबत विचारणा केली म्हणून वीजवितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; महिला कर्मचारीही जखमी

वीज चोरीबाबत विचारणा केली म्हणून वीजवितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; महिला कर्मचारीही जखमी

नाशिक : भारतनगरमध्ये वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या दोन कर्मचार्‍यांना दोन युवकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१५) दुपारी दीड वाजेदरम्यान घडली. ही घटना मोबाईल कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी वैभव अनिल कांडेकर यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित इरशान इब्राहीम पठाण (वय ३३), रोजशीन इरशान पठाण (३०, रा. भारत नगर, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व कांडेकर यांच्या फिर्यादीनुसार, शिवाजीवाडी उपकेंद्रातील तंत्रज्ञान कर्मचारी वैभव अनिल कांडेकर (वय २८) व त्यांचे सहकारी कर्मचारी सुप्रिया बुवा बुधवारी (दि. १५) दुपारी दीड वाजेदरम्यान भारतनगर गल्ली नंबर ९ मध्ये वीज देयके वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी संशयित इरशान इब्राहीम पठाण व रोजमीन इरशान पठाण यांना वीज देयके संदर्भात विचारणा केली असता, त्यांच्याकडे वीज मीटर नव्हते, तरीही मोबाईल चित्रीकरणामुळे गांभीर्य आले समोर त्यांच्या घरात पंखा व लाइट सुरू होता.

याबाबत कांडेकर यांनी विचारणा केली असता, शेजारी राहणार्‍या अन्सर सय्यद याच्याकडून वीज जोडणी घेतली असल्याचे समोर आले. त्यावर कांडेकर यांनी असे करणे गुन्हा असून, दोघांवरही वीजचोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगितले. त्याचा राग आल्याने पठाण आणि त्याच्या कुटुंबियांनी कर्मचार्‍यास मारहाण केली. सहकारी कर्मचारी बुवा महिला कर्मचार्‍यास शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे करीत आहेत.

व्हिडिओ व्हायरल 

दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमाचा तसेच मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज मध्यमांवर व्हायरल झाला आहे. यात वीज कर्मचारी वैभव कांडेकर यांच्यासह महिला कर्मचारी सुप्रिया बुवा यांना संशयित व त्याचे साथीदार बेदम मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत.

First Published on: March 16, 2023 8:15 PM
Exit mobile version