CoronaVirus: …त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढू शकतात – ऊर्जामंत्री नितीन राऊत

CoronaVirus: …त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढू शकतात – ऊर्जामंत्री नितीन राऊत

सध्या राज्यातील स्टाफचे अव्हरेज बिलिंगमुळे पगार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वर्तवली आहे. केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऊर्ज विभागासाठी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असे नितीन राऊत म्हणाले.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि आरएसीच्या माध्यमातून हे ९० कोटींचे पॅकेज येणार आहे. हे कर्जरुपाने पॅकेज केंद्र सरकारच्या आर्थिक संस्थांकडून देण्यात आले. या कर्जावर व्याज लावण्यात आले. तर याचा बोझा डेस्क ऑपवर पडेल आणि डेस्क ऑपचा बोझा लोकांवर पडू शकतो. त्यामुळे वीजेच्या दरात वाढ होऊ शकते. आम्ही आजमित्तील २१ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊ वीजेचे दर कमी करून विभाग चालवत आहोत. त्यामुळे अद्याप सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे नेमके कशापद्धतीने देणार हे स्पष्ट केलेले नाही. जर कर्जरुपी आणि व्याजदराने हे पॅकेज दिले तर दरवाढ करावीच लागेल, असे नितीन राऊत म्हणाले.

कोरोनाच्या संकटामुळे काही काळसाठी उद्योग आलेले उद्योग सुरू करण्यात यावे. तसेच नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्यागिक वसाहतींतील उद्योग पुन्हा सुरू करून उत्पादन निर्मित करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.


हेही वाचा – CoronaVirus: शरद पवार बीकेसीच्या कोविड हॉस्पिटल भेटीला


 

First Published on: May 15, 2020 8:47 PM
Exit mobile version