घरताज्या घडामोडीCoronaVirus: शरद पवार बीकेसीच्या कोविड हॉस्पिटल भेटीला

CoronaVirus: शरद पवार बीकेसीच्या कोविड हॉस्पिटल भेटीला

Subscribe

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील बांधकाम सुरू असलेल्या कोरोना रुग्णालयाची आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शरद पवार यांनी पाहणी केली. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात आज राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बैठकसुद्धा झाली. बैठक संपताच आरोग्यमंत्र्यांसोबत शरद पवार थेट बीकेसीच्या कोविड रुग्णालयात पोहोचले.

मुंबई महापालिकेने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा वापर आता कोरोनाच्या उपचारासाठी करण्याचा निर्णय घेतला होता. या मैदानाची महाकाय क्षमता पाहता याठिकाणी १ हजार बेड्सची व्यवस्था करण्याची सुरुवात झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे ही सुविधा महापालिकेसाठी उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे नजीकच्या धारावी परिसरासाठीही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

पूर्व आणि पश्चिम उपनगरात मध्यवर्ती ठिकाणी असे एमएमआरडीएचे मैदान आहे. तसेच ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची कनेक्टिव्हिटी पाहता या एमएमआरडीए मैदानाची कनेक्टिव्हिटी रूग्णांची ने आण करण्यासाठी सोयीची अशी आहे. त्यामुळेच एमएमआरडीए मैदानाची निवड महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. हॉस्पिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातूनही हे ठिकाण अतिशय मोक्याचे असे आहे. मुंबई महापालिकेने शहरातील कंटेन्मेट झोन पाहता आणि लोकसंख्येची घनता पाहता ज्याठिकाणी मोठ्या क्षमतेची बेड्सची व्यवस्था करता येईल अशा ठिकाणांची निवड केली आहे. त्यामध्ये गोरेगाव नेस्को, वरळीतील एनएससीआय यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -