आघाडी झाली तरी शिवसेना पुण्यात महापालिकेच्या 80 जागा लढवेल

आघाडी झाली तरी शिवसेना पुण्यात महापालिकेच्या 80 जागा लढवेल

चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष भारतात सुखाने झोपलाय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना पक्षाकडून पुण्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आगामी महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

राऊत शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना किंग आणि किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडे आमचे लक्ष आहे, असे राऊत यांनी सांगितले.शरद पवार यांच्यावर टीका करणे आजकाल फॅशन झाली आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नव्हेत, असा टोला राऊत यांनी लगावला. खेडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना वादावरही राऊत यांनी भाष्य केले. सत्ता असली किंवा नसो आमच्यासाठी शिवसेना महत्वाची आहे. त्यामुळे जिथे शिवसेनेवर अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहणारच, असे राऊत म्हणाले.

राजकारण हे आपले आपण करायचे असते. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणार्‍या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे यांना भविष्यात शिवसेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी ‘परमेश्वराला ठाऊक’, असे मोघम उत्तर दिले होते.

First Published on: June 6, 2021 5:10 AM
Exit mobile version