शेवटचा आमदार शिवसेना सोडून गेला तरी मी शिवसेनेतच राहील – वैभव नाईक

शेवटचा आमदार शिवसेना सोडून गेला तरी मी शिवसेनेतच राहील –  वैभव नाईक

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मिळणारा आमदारांचा पाठिंबा पाढत आहे. शिवसेनेच्या गोटातील आतापर्यंत 40 पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. 40 पेक्षा अधिक आमदर एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. रविवारी उदय सामंत देखील शिंदे गटात सहभागी झाले. या सर्व प्रकारावर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, शेवटचा आमदार शिवसेना सोडून गेला तरी मी शिवसेनेतच राहील. खुर्चीसाठी काहीजण पक्षाला सोडून जात आहेत. बंडखोर आमदारांच्या पाठीमागे भाजपा आहे. प्रताप सरनाईक, यामीनी जाधव यांच्यासारख्या आमदारांवर भाजपाने आरोप केले आहेत, त्यांच्या चौकशा लावल्या आहेत. त्यामुळे काही आमदार हे ईडीच्या भीतीने फुटल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी दीपक केसरकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत हे केसरकर यांच्या मतामुळे खासदार झाले नाहीत. मात्र, केसरकर यांनी निवडून देणाऱ्या मतदारांना आज काय वाटत असेल असा टोला देखील आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी लगावला आहे.

राऊतांना ईडीची नोटीस –

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात शिवसेना नेते संजय राऊत यांना मोठा झटका बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले असून, उद्या हजर राहण्यास सांगितले आहे.

 

First Published on: June 27, 2022 4:15 PM
Exit mobile version