राज्यपाल कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानानं खळबळ

राज्यपाल कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानानं खळबळ

औरंगाबाद : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झालाय. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलंय. मराठी दिनाच्या निमित्तानं औरंगाबाद येथे आयोजित श्रीसमर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते.

चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं म्हणत नाही. पण गुरूचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरूला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असा दावा करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वाद ओढवून घेतलाय.

विशेष म्हणजे अमरावती आणि धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून आधीच मोठा वाद निर्माण झालाय. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानानं त्या वादाला आणखी फोडणी मिळालीय. मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून समर्थ आणि आजपर्यंत अनेक लोकांनी आपल्या परीने योगदान दिलं. आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. समर्थांच्या साहित्याबद्दल आज दिवसभरात भरपूर चर्चा झाली असेल. यानंतर आपल्याला नक्कीच असं वाटलं असेल की समर्थांचा जो भारत, समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे,” असंही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.


हेही वाचाः रशिया- युक्रेन अणूयुद्धाच्या दिशेने?, अणूबॉम्बसंदर्भात स्पेशल फोर्सला तयार राहण्याचे पुतिन यांचे निर्देश

First Published on: February 28, 2022 8:12 AM
Exit mobile version