घरताज्या घडामोडीरशिया- युक्रेन अणूयुद्धाच्या दिशेने?, अणूबॉम्बसंदर्भात स्पेशल फोर्सला तयार राहण्याचे पुतिन यांचे निर्देश

रशिया- युक्रेन अणूयुद्धाच्या दिशेने?, अणूबॉम्बसंदर्भात स्पेशल फोर्सला तयार राहण्याचे पुतिन यांचे निर्देश

Subscribe

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या चौथ्या दिवशी दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढला. रशिया-युक्रेनमधील वाटाघाटीच्या चर्चा सातत्याने फिस्कटत असताना युरोपियन देशांकडून युक्रेनला होणार्‍या मदतीचा ओघही वाढतच चालला आहे. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी रशियावरील पश्चिमी देशांचे निर्बंध अयोग्य असल्याचे म्हणत अणूबॉम्बसंदर्भातील स्पेशल फोर्स (न्यूक्लयर डिटेरन्स फोर्स) ला तयार राहण्याचे निर्देश दिले. त्यामुळे हे युद्ध आता अणुयुद्धाच्या दिशेने चालले आहे काय? अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी किव्हमध्ये अलर्ट लागू करण्यात आला असून नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रशियाने शेजारील बेलारूसमध्ये युक्रेनला चर्चेची ऑफर दिली होती. मात्र, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही ऑफर फेटाळून लावली. ज्या ठिकाणाहून त्याच्या देशावर हल्ला झाला आहे, त्या ठिकाणाहून आपण रशियाशी बोलणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान रशियाचे लष्कर युक्रेनची राजधानी किव्हमध्ये शिरले असून रशियन सेनेने युक्रेनच्या एका महत्वाच्या हवाई तळावरही कब्जा केला. दोन्ही देशांमध्ये जोरदार धूमश्चक्री सुरू असतानाच रशियाचे 26 हेलिकॉप्टर्स, 146 रणगाडे आणि 38 गाड्या उद्ध्वस्त करत 4 हजारपेक्षा जास्त रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. याबरोबरच जगभरातील 84 देश आमच्यासोबत असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. या देशांनी रशियाला आंतरराष्ट्रीय बँकिंग ऑपरेटिंग सिस्टममधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

रशियाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले

युक्रेनने रशियन सरकारला आपल्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर हल्ला केल्याबद्दल हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केल्याची माहिती दिली. तसेच, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील रशियाची जागा काढून घेतली पाहिजे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षा रक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना प्रवेश दिला आणि भारतीयांना बाजूला काढून मुले आणि मुली न पाहता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

२४० भारतीय मायदेशी

युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आलेले तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. आतापर्यंत 4 विमानांमधून 1,147 जणांची घरवापसी झाली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -