नांदेडमध्ये बाल तपस्वीं महाराजांच्या हत्येमुळे खळबळ!

नांदेडमध्ये बाल तपस्वीं महाराजांच्या हत्येमुळे खळबळ!

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठगा येथील बाल तपस्वी निर्वाण रूद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री दीड वाजता गळा दाबून हत्या करण्यात आली. त्याचबरोबर त्याच मठामधील बाथरूममध्ये एकाचा मृतदेह आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच पालघरमध्ये झालेल्या घटनेत  दोन साधूंची हत्या करण्यात आली होती.

रविवारी रात्री नागठणा  येथे तरूणाने बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या मठात शिरून त्यांची गळा दाबून हत्या केली. तसेच त्यांच्याजवळीच सर्व ऐवज लुटला. यावेळी तो महाराजांच्या गाडीमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना शेजारी असलेले लोक जागे झाले. त्यामुळे त्याने तेथून पळ काढला. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचे पार्थिक शरीर उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हत्येची माहिती मिळताच भाविकांनी ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली.

ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला. त्याच मठातील बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आढळून आला आहे. या मयताचे नाव भगवान शिंदे असून ते रा.चिंचाळा उमरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


हे ही वाचा – तर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल, राऊत यांची सामन्यातून रोखठोक भूमिका!


 

First Published on: May 24, 2020 11:39 AM
Exit mobile version