रमझान व बासी ईद निमित्त बेस्टतर्फे जादा बसगाडया

रमझान व बासी ईद निमित्त बेस्टतर्फे जादा बसगाडया

मुंबई : मुस्लिम धर्मियांची ‘ रमजान ईद’ येत्या २२ एप्रिल रोजी आहे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी ‘बासी ईद’ आहे. मुस्लिम बंधू, भगिनी, कुटुंबीय हे ‘रमजान ईद’ नंतर दुसऱ्या दिवशी बासी ईद निमित्ताने गेट वे ऑफ इंडिया, जुहू , गिरगाव चौपाटी, राणीची बाग आदी पर्यटनस्थळी फिरायला जातात. त्यामुळे त्यांना बेस्टच्या बसमधून प्रवास करणे सुलभ व्हावे, पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने ‘रमजान ईद’निमित्ताने जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. (Extra buses by BEST on the occasion of Ramzan and Basi Eid)

बासी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव संपूर्ण शहरात, विशेषत: मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजीनगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, अँटॉप हिल इ. भागांत अतिरिक्त गर्दी होते. यानिमित्त बेस्ट यंदा १६५ जादा बस सोडणार आहे. या जादा बसगाड्या शनिवार व रविवारी बासी ईदच्या दिवशी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होतील.

या बसगाड्या ७ म., ए १९, ए २१, २२ म., ए २५, २५ मर्या, २८ ,सी ३३, ३७, ए ४५, ए ५९ , ५१ , सी ७१ , ए ७७ ,८४ म, सी ८६ , ८८ . १०८ . ए १२४, ए १३४ , ए १३५ ,१७२ , ए १७२ ,२०३ . ए २०३ . २११ , २२४ , २३१ , २४१ , ए २५६ , ए २६९ . २७१ , २७२ , ए २७३ , सी ३०२, ३०३, ३१७, ३२६, ३३२, ३५२ , ए ३५७ , ए ३६७ , ए ३७६ , ए ३८५ ,३९६ म . ४११ , ४२२ ,४९६ म . ५०१ म ,५०७ म . सी ५२१ , ५२४ म . ५३३ म . ५४५ म . सी ७०० , ७०६ म .सी ७१८ या मार्गावर धावणार आहेत.


हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हे अचानक नव्हतं…’, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

First Published on: April 21, 2023 8:06 PM
Exit mobile version