घरताज्या घडामोडी'उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हे अचानक नव्हतं...', अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

‘उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हे अचानक नव्हतं…’, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Subscribe

'उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं हे अचानक नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अधून मधून थोडं कानावर यायचं. नंतरच्या काळात ते नाराज होते', असा गौप्यस्फोट राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. एका कार्यमाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला.

‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं हे अचानक नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अधून मधून थोडं कानावर यायचं. नंतरच्या काळात ते नाराज होते’, असा गौप्यस्फोट राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. एका कार्यमाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. (NCP Ajit Pawar Uddhav Thackeray Eknath Shinde CM Maharashtra BJP)

नेमके काय म्हणाले अजित पवार?

- Advertisement -

“उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं हे अचानक नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अधून मधून थोडं कानावर यायचं. नंतरच्या काळात ते नाराज होते. त्यांच्या मनात काही वेगळं शिजत होतं, हे आम्हाला कळत होतं. आम्ही ते पवार साहेबांच्या कानावर घातलं, उद्धव ठाकरेंना सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे मी बोलतो. पण बोलून एखाद्याच्या मनात वेगळं चाललंय आणि तुम्ही विचारलं की काही गडबड नाही ना? मग ते काय म्हणणार आहे का की माझ्या मनात गडबड आहे?”, असे अजित पवार म्हणाले.

“जवळपास उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यापासून भाजपा हे सरकार बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करत होतं. एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की माझे पती वेशभूषा बदलून बाहेर जायचे. त्यांनाही माहित नव्हतं की कशासाठी जातायत. जेव्हा पत्नीला घरी ठेवून पुरूष बाहेर पडतो, तेव्हा त्यातून दोन तीन अर्थ निघतो. आणि त्यानंतर अनेकांनी सांगितलं की ते दोघे आधी भेटले. याचा अर्थ ही गोष्ट एका दिवसात झालेली नव्हती”, असेही अजित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवे होते – शरद पवार

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात तिन्ही पक्षांचा सहभाग होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येत संख्येची चाचपणी करून हा निर्णय घेतला होता. मात्र त्या संबंधित जर कोणी विचार करून दुसरा निर्णय घेत असेल आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत याबाबत चर्चा करणे आवश्यक होते. कारण चर्चा न करता निर्णय घेण्याचे भविष्यात दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.


हेही वाचा – आत्ताच मुख्यमंत्रीपदावर क्लेम करायला तयार; अजित पवारांचे सूचक विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -