जुन्या पेन्शन योजनेवरून फडणवीसांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, लाज वाटत…

जुन्या पेन्शन योजनेवरून फडणवीसांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, लाज वाटत…

संग्रहित छायाचित्र

Devendra Fadnavis criticizes Congress-NCP over old pension scheme |नागपूर – जुन्या पेन्शन योजनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे. काँग्रेस-राष्ट्रावादीने पेन्शन योजना बंद केली, तरी भाजपालाच नाव ठेवलं जात असल्याचं फडणवीस म्हणाले. विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार आणि भाजपाचे उमेदवार नागो गाणार यांच्या निवडणूक रणनीती संदर्भात भाजपची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक; पाऊस मुबलक, पण नैसर्गिक आपत्तीचे संकेत

काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचं कौतुक करावंसं वाटतं. कराण त्यांना लाजच वाटत नाही. पेन्शनचा प्रश्न त्यांनीच निर्माण केला आहे. २०१० मध्ये त्यांनीच पेन्शन बंद करण्याची योजना लागू केली. त्याच्या आधीही त्यांचं सरकार होतं आणि त्यानंतरही त्यांचंच सरकार सत्तेवर होतं. त्यांनी जुनी पेन्शन बंद केली आणि आता भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर असं वातावरण निर्माण करत आहे जणून भाजपानेच पेन्शन रद्द केली आहे, असं फडणवीस म्हणाले.

पेन्शनचा निर्णय तडकाफडकीने घेतला जात नाही. कारण आपल्याला शिक्षकांचं, कामगारांचं, शेतकऱ्यांचं सर्वांचं भवितव्य पाहायचं आहे. जुन्या पेन्शनचा निर्णय घेतला तर अडीच लाख कोटींचा बोजा पडेल. तसं झाल्यास पगारही देता येणार नाही. त्यामुळे मी सांगितले की आम्ही या संदर्भात विचारपूर्वक निर्णय करू. तुम्ही जुनी पेन्शन योजना आज लागू करा असे म्हणणार असाल तर आज राज्याची परिस्थिती तशी नाही. मात्र भविष्यात नक्कीच राज्याचा आर्थिक विकास होऊन तशी स्थिती निर्माण होईल, ज्या वेगाने आपण थ्री ट्रिलियन इकॉनोमीकडे वाढतो आहे नक्कीच तशी अवस्था येईल, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – क्रिकेटच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली आहे. गाणार सर गेली १२ वर्षे काम करत आहेत. आमदार झाल्यावरही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल नाही. नाहीतर काही आमदारांचं विमान एक-दोन वर्षांमध्येच जमिनीवर उतरत नाहीत. नागो गाणार शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी नगिडीत प्रश्न आवर्जून सोडवतात, असं कौतुकही देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

First Published on: January 16, 2023 9:26 AM
Exit mobile version