खुशखबर! राज्यातील बळीराजाला मिळणार दिलासा; एसटीतून होणार माल वाहतूक

खुशखबर! राज्यातील बळीराजाला मिळणार दिलासा; एसटीतून होणार माल वाहतूक

एसटीतून होणार माल वाहतूक

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा माल देखील बाजारात पोहचत नाही. त्यामुळे बळीराजाची चिंता सुद्धा वाढली आहे. या संबंधित दैनिक ‘आपलं महानगरनं’ प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आता एसटी महामंडळाने बळी राजाला वाचविण्यासाठी एसटीतून मालवाहतूक सुरु केली आहे. ही मालवाहतूक एसटीच्या प्रवासी बसमधून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा माल थेट गावातून चक्क शहरातील बाजारपेठेत एसटी मार्फत दाखल होणार आहे. पहिल्या टप्यात एसटीच्या १०० गाड्या मालवाहतुकीसाठी तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष Adv अनिल परब यांनी दिली आहे.

पहिल्या टप्पात १०० गाड्या तयार करणार

करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीत आणि आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहे. तब्बल दोन महिन्यानंतर ही एसटीची सेवा हळूहळू राज्यात सुरु होत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यात एसटी महामंडळाच्या महसुलात सुद्धा लक्षणीय घट झाली आहे. लॉकडाऊन पूर्वी एसटी महामंडळाचा तोटा हा ५ हजार कोटी होता. तो आता ६ हजार कोटीवर जाऊन पोहचला आहे. शुक्रवारपासून जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु केल्या आहेत. मात्र, या बसेसमधून ५० टक्के प्रवाशांची वाहतूक करता येत आहे. त्यामुळे सुद्धा एसटीला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एसटी महामंडळाचे महसूल वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या शेती मालासाठी एसटी महामंड्ळाकडून सुरु केली जाणार आहे. यापूर्वी तत्तकाली परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी खासगी माल वाहतूकदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी एसटीला मालवाहतूक क्षेत्रात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी विशेष बसेस सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, पुढे या योजना सुरु होण्या आगोदर बंद पडली होती. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. त्यामुळे महूसल वाढविण्याकरिता परिवहन मंत्री अनिल परब ही योजना पुन्हा सुरु केली आहे. पहिल्या टप्यात एसटीच्या १०० बसेसला मालवाहतुकीसाठी रूपांतर करण्यात येणार आहे.

काय होती बातमी

उन्हाळ्याचा हंगाम लक्षात घेत बऱ्याच शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची लागवड केलेली आहे. मात्र, आता पालेभाज्या उत्पन्न निघाल्यानंतर कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे खासगी वाहन सुद्धा माल बाजारात घेऊन जाण्यास नकार देतात. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जर खेड्यापाड्यात जाणारी एसटी शेतकऱ्यांसाठी सुरू झाली तर शेतकऱ्यांना मोठी मदत होईल, अशी मागणी कोकणातील तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून एसटी महामंडळाकडे केली होती. यासंबंधित वृत्त दैनिक आपलं महामनगरं प्रकशित केले होते. या वृत्ताची दाखल घेत एसटी महामंडळाकडून एसटी बसेस मार्फत माल वाहतूक सुरु करण्याची घोषणा केली आहे.

मालवाहतुकीच्या बुकिंगची व्यवस्था

मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुकिंगची व्यवस्था, महामंडळाच्या प्रत्येक आगारात आणि बस स्थानकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे, यासाठीची कार्यप्रणाली लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

मालवाहतूकीसाठी  स्वतंत्र कक्षाची निर्मिती

मालवाहतुकीची कार्यप्रणाली ठरविण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यालयात समन्वय अधिकाऱ्याची (नोडल ऑफिसर) ची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे समाजातील सर्व घटकांना म्हणजेच शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना माफक दरात उपलब्ध करून दिलेल्या मालवाहतुकीच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा, असे आवाहन माननीय परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष Adv अनिल परब  यांचेकडून करण्यात आलेले आहे.


हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात २९४० कोरोना रुग्णांची नोंद; तर ६३ जणांचा मृत्यू


First Published on: May 22, 2020 8:49 PM
Exit mobile version