उमरेडच्या जंगलात आढळला आणखी एका वाघिणीचा मृतदेह

उमरेडच्या जंगलात आढळला आणखी एका वाघिणीचा मृतदेह

विष प्रयोगामुळे वाघांचा मृत्यू

नागपूर फॉरेस्ट रेंजमधील उमरेड-पवनी-क-हांडला अभयारण्यात सोमवारी आणखी एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच परिसरात रविवारी चार्जर नामक वाघाचा मृतदेह आढळून आला होता. सलग दोन वाघांच्या मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार उमरेड-पवनी-क-हांडला अभयारण्यात सोमवारी म्हणजे ३१ डिसेंबरला सकाळी वन विभागाचे कर्मचारी गस्तीसाठी गेले होते. त्यांना चिचगाव कंपार्टमेंट क्रमांक २२६ मध्ये मादी जातीचा वाघ मृतावस्थेत आढळून आला. वन्यजीव विभागात टी-४ म्हणून नोंद असलेल्या या वाघिणीला राही नावाने ओळखले जात होती. रविवारी चार्जरचा मृतदेह आढळला त्या ठिकाणापासून काही अंतरावर राही मृतावस्थेत दिसून आली. मृतदेहापासून काही अंतरावर एका रानडुक्कर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे राहीचा मृत्यूही रविवारीच झाला असावा असा अंदाज वन्यजीव विभागाने वर्तविला आहे.

चार्जरचा मृतदेह आढळला

सिद्ध वाघ जयचा बछडा ‘चार्जर’चा मृतदेह आढळ्याने खळबळ माजली आहे. उमरेड- पवनी-करांडला अभयारण्यातील हा जय हा प्रसिद्ध वाघ आहे. रविवारी सकाळी या ठिकाणी पर्यटक जंगलात फेरफटका मारत असताना त्यांना एक वाघ जंगलात मृतावस्थेत आढळला. या संदर्भातील माहिती वन विभागाला देण्यात आली. हा वाघाचा बछडा असून जय वाघाचा असल्याचे देखील समजत आहे त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

चार्जरचा मृत्यू संशयास्पद?

उमरेड- पनवी- करांडला अभयारण्यात पर्यटकांनी गर्दी असते. या ठिकाणी जंगलसफारीसाठी रविवारी काही पर्यटक आले होते. चिंचगाव जंगलातील कंपार्टमेंट क्रमांक २२६ मध्ये त्यांना वाघ मृतावस्थेत दिसून आला. पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार वन विभागाचे अधिकारी तातडीने आले आणि त्याने तपासणी केल्यावर हा जयचा बछडा राजा उर्फ चार्जर असल्याचे समोर आले. या बछडयाचे पोट फुगलेले होते. त्यामुळे याला विषबाधा झाली असावी, असा प्राथनमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – 

जय वाघाच्या बछड्याचा संशयास्पद मृत्यू

First Published on: December 31, 2018 4:21 PM
Exit mobile version