‘इंदुरीकर महाराजांमध्ये विकृत लक्षणे दिसतात’

‘इंदुरीकर महाराजांमध्ये विकृत लक्षणे दिसतात’

इंदुरीकर महाराज

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे विधान करणारे ‘प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. कीर्तन करीत असताना चेष्टा, मस्करी, विनोद करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यात विकृत लक्षणे दिसतात. तसेच त्यांनी आपली ध्वनिचित्रफीत युटयूबवर अपलोड करत पुत्र प्राप्तीसाठी संदेश दिला आहे. त्यांनी केलेले हे वक्तव्य संविधानविरोधी आणि अशास्त्रीय आहे. त्यांचे हे विधान पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंधन असून त्यांच्या कीर्तनातून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे ते महिलांची अवहेलना आणि द्बेष करतात’, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत केली आहे.

 

 

काय बोले होते इंदुरीकर महाराज?

४ जानेवारीला यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान केले होते. त्यानंतर या घटनेची दखल अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार इंदुरीकर महाराज यांना नोटीसही पाठवून पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सल्लागार समितीकडून घेण्यात आला आहे. तसेच इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत पुरावे जमा करण्याचा निर्णयही समितीकडून घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात अधिक पुरावे जमा करण्याचा निर्णयही समितीकडून घेण्यात आल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.


हेही वाचा – पुलवामा हल्ल्याबाबत जुन्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा युटर्न; झेंड्याबाबतही दिले स्पष्टीकरण


First Published on: February 14, 2020 12:56 PM
Exit mobile version