पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग

पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग

पुण्यात पाटील इस्टेलला भीषण आग

पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलजवळ भीषण आग लागली आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. पाटील इस्टेटच्या गल्ली नंबर ३ मध्ये ही आग लागली आहे. आग वाढत चालल्यामुळे परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी घरं खाली करण्यास सुरुवात झाली आहे. आगीमुळे झोपडपट्टीमधील सिलेंडर स्फोट होत आहे त्यामुळे आग वाढत आहे. अग्निशमन दलाच्या ३० पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. मात्र चिंचोळ्या गल्ल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून जीवितहानी नाही. आगीचे कारण अस्पष्ट आहे. तीन तास होऊन ही आग अटोक्यात नाही. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

पाटील इस्टेट झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीमध्ये २ जण जखमी झाले आहेत. तर १५० पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग वाढत चालली असून पाटील इस्टेटच्या गल्ली नंबर ३, ४ , ५, ६ आणि ७ पर्यंत आग पसरली आहे. झोपडपट्टीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे. आग वाढत चालल्यामुळे झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक घरं खाली करत आहेत. अनेक जण घरातील सर्व सामान घेऊन बाहेर पडत आहे. परिसरामध्ये बघ्यांची गर्दी झाल्यामुळे त्याठिकाणी गर्दी करुन नये असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. दरम्यान उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक तरुण अग्निशमन दलालाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मदत करत आहेत.

 

First Published on: November 28, 2018 2:29 PM
Exit mobile version