पुण्यातील कार शोरुमला भीषण आग

पुण्यातील कार शोरुमला भीषण आग

पुण्यातील कार शोअरुमला भीषण आग

पुण्यातील वाघोली येथे एका कार शोरुमला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. वाघोली येथील मारुती सुझुकी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका, पीएमआरडीए आणि आजूबाजूच्या एमआयडीसीचे बंब दाखल झाले होते. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन तासांनी आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक दृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

स्पेअर पार्ट जळून खाक

वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या बाजूला मारुती सुझुकीचे साई सर्व्हिस स्टेशन आहे. या सर्व्हिस स्टेशनला रात्री १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास तिथे आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वर्दी येरवडा अग्निशामक केंद्रातील जवान अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घेऊन घटनास्थळी रवाना झाले. मात्र, आगीचे स्वरूप बघता अजून गाड्या बोलवण्यात आल्या. त्यानंतर दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने आतील गाड्या बाहेर काढण्यास वेळ मिळाला. परंतु, या आगीत गाडीचे सुटे भाग जळून खाक झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.


हेही वाचा – खड्ड्यांनी ‘सजलाय’ मुरुडचा रस्ता !


 

First Published on: August 25, 2019 10:27 AM
Exit mobile version