आधी सुरक्षा काढली, मग घरावर हल्ला केला, पण…; भास्कर जाधवांचा सरकारविरोधात हल्लाबोल

आधी सुरक्षा काढली, मग घरावर हल्ला केला, पण…; भास्कर जाधवांचा सरकारविरोधात हल्लाबोल

bhaskar jadhav

नवी मुंबई – शिवसेनेचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला. यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. रात्री माझी सुरक्षा काढून घेतली आणि मग चिपळूणच्या घरावर हल्ला करण्यात आला. पण मी घाबरणारा नाही. चिपळूणमध्ये हल्ला झाला तरी मी इथे आहे, कारण मी घाबरत नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. ते आज नवी मुंबई पोलिसांविरोधात उगारलेल्या आंदोलनस्थळी बोलत होते.

हेही वाचा – ठाकरेंच्या अडचणीत वाढ; बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी हायकोर्टात याचिका

भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घराबाहेरील पटांगणात उभ्या असलेल्या कारजवळ दगडांसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर चिपळूण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. एकीकडे चिपळूणमध्ये घरावर हल्ला झालेला असताना भास्कर जाधव यांनी नवी मुंबईतून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनी काल विमानतळावर माझं जंगी स्वागत केलं. पोलिसांचा फौजफाटा, शिवसैनिकांसह मला हारतुरे घातले. पण, सायंकाळी समजलं की माझी  सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मी कधीच सुरक्षा मागितली नव्हती. पण तरीही मला सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, रात्री सुरक्षा काढून टाकण्यात आली. सुरक्षा काढून टाकल्यानंतर लागलीच माझ्या घरावर हल्ला झाला. शरद पवारांच्या घरावरही हल्ला केलात. तिथे भास्कर जाधव अशा हल्ल्याला काय भिक घालतो. जा काय करायचंय ते करा. मी रणांगणांतून पळ काढणारा माणूस नाही. मी इथे उभा आहे. आणि तिथे चार दोन हजार माणसं भास्कार जाधववर अन्याय होऊ नये हे सांगायला उभे आहेत, असा एल्गार भास्कर जाधवांनी पुकारला.

हेही वाचा – आमदारावर नाराज होऊन भाजप नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, प्रकाश सुर्वेंच्या प्रयत्नांना यश

ते म्हणाले की, भायखळाच्या शाखेत शाखाप्रमुखावर अन्याय झाला म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वतः पोलिसांत जाऊन जाब विचारला होता. शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच आवाज उठवला आहे. तरीही त्यांच्या नेतृत्त्वावर शंका कुशंका उपस्थित केली जाते. बाळासाहेब ठाकरेंनी जशी शिवसेना वाढवली. तशीच शिवसेना उद्धव ठाकरे यांनीही वाढवली.

तुम्ही दाखल केलेल्या नोटीसींनी आम्ही घाबरत नाही. जाणीवपूर्वक केसेस केल्या तरी आम्ही डगमगणार नाही. शिवसेनेच्या वाईट काळात उभे राहणाऱ्यांसोबत शिवसेना नेहमीच पाठिशी राहणार आहे. गुन्हे दाखल केलेल्यांना आम्ही पाठ फिरवणार नाही, असंही भास्कर जाधव म्हणाले.

First Published on: October 19, 2022 1:15 PM
Exit mobile version