panvel news : पनवेलकर घेणार शुध्द हवेचा ‘श्वास‘

panvel news : पनवेलकर घेणार शुध्द हवेचा ‘श्वास‘

धूळ शमन वाहनाचा आढावा घेताना पालिका आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ त्यांच्या समवेत इतर अधिकारी.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ शमविण्यासाठी दोन धूळ शमन वाहने (मल्टिपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकल्स) पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. शहरातील धुळीचे प्रमाण थोपविणे आणि हवेची गुणवत्ता सुधारण्याचे महत्वपूर्ण काम या दोन्ही वाहनांच्या माध्यमातून केले जाणार आहे. या दोन्ही वाहनांचा प्रात्यक्षिकातून आढावा आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी नुकताच घेतला.(panvel city pollution control MISSION)

यावेळी उपायुक्त डॉ.वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, घनकचरा व आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे स्वच्छता निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरणाचे भान जपण्यासाठी महापालिका ‘माझी वसुंधरा‘ संकल्पने अंतर्गत विविध कार्यक्रम राबवत आहे.

हेही वाचा… Bhayander News: सूर्या प्रकल्पाचे पाणी मे ऐवजी नोव्हेंबर महिन्यात मिळणार

या कार्यक्रमाच्या जोडीला महापालिकेने नुकतीच दोन अत्याधुनिक बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन व्हेइकल्स् धूळ शमन वाहने खरेदी केली आहेत.या वाहनामध्ये फवारणी आणि साफसफाईच्या उद्देशाने ६००० लीटरची पाण्याची टाकी, एअर कर्टनवर आधारित वॉटर मिस्ट सप्रेशन सिस्टीम, फ्रंट आणि रिअर रोड फ्लशिंग सिस्टीम, ग्रीन बेल्ट गार्डनिंग क्लिनिंग सिस्टीम, आणि उंच झाडांवरील धूळ साफ करण्याच्या दृष्टीने वैशिष्ट्य पूर्ण यंत्रणा आहे. ही वाहने दररोज अंदाजे ८० किलोमीटरचा प्रवास करुन शहराचा विस्तृत परिसरातील केवळ धूळ कमी करत नाही तर रस्ता आणि दुभाजकांमधील हरित पट्टा स्वच्छ करण्यासही मदत करत आहेत.

हेही वाचा… सरकारी तिजोरीत 330 कोटी 28 लाख

First Published on: April 24, 2024 7:51 PM
Exit mobile version