सोलापूर : पोलीस – दरोडेखोरांमध्ये चकमक; १ दरोडेखोर ठार ५ फरार

सोलापूर : पोलीस – दरोडेखोरांमध्ये चकमक; १ दरोडेखोर ठार ५ फरार

झारखंडमधील दोन दरोडेखोर गजाआड

सोलापूर – तुळजापूर रोडवर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात शनिवारी मध्य रात्री पोलीस आणि दरोडेखोर यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दरोडेखोरांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह दोन पोलीस जखमी झाले असून एक दरोडेखोर ठार झाला आहे. दरम्यान, जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पाच दरोडेखोर फरार झाले असून पोलीस या फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरोडेखोरांनी पोलिसांवर केला हल्ला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना उळे गावाजवळ पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्यामुळे पोलिसांनी दरोडेखोरांना हटकले आणि एकाला पकडून गाडीत बसवत असताना तो दरोडेखोर पोलिसांना ‘साहेब…चुकले’, म्हणत होता. त्याच दरम्यान इतर दरोडेखोराच्या सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यावर हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला करत दगडफेक देखील करण्यात आली.

एक दरोडेखोर ठार

या हल्ल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस निरीक्षक पाटील यांनी दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला, यामध्ये एक दरोडेखोर जखमी झाला होता. या दरोडेखोराला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर दुसरीकडे, घटनास्थळी सकाळी दोन कार आढळल्या असून यातील एका गाडीचा क्रमांक MH – 13 AZ/1798 असा आहे. एका गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या गाड्या पोलिसांच्या आहेत की दरोडेखोरांच्या हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे समोर आले आहे.


वाचा – जीव धोक्यात टाकून दरोडेखोराला पकडणाऱ्या बीट मार्शलचा सत्कार

वाचा – दरोडेखोर-पोलिसांचा एकमेकांवर गोळीबार


 

First Published on: February 10, 2019 9:19 AM
Exit mobile version