FM Sitharaman : पैसे नसल्यामुळे अर्थमंत्र्यांनी उमेदवारी नाकारली, देशाचं अर्थकारण फसलं; विरोधकांचा टोला

FM Sitharaman : पैसे नसल्यामुळे अर्थमंत्र्यांनी उमेदवारी नाकारली, देशाचं अर्थकारण फसलं; विरोधकांचा टोला

पेट्रोलच्या दरांसारखे आयुष्याचे शतक पार करा, रोहित पवारांच्या अर्थमंत्र्यांना खोचक शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. मात्र निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव फेटाळा आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे ‘आवश्यक निधी’ नाही, असे कारण त्यांनी दिले आहे. याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपावर निशाणा साधला आहे. (FM Nirmala Sitharaman Finance Minister rejected candidature due to lack of money countrys economy failed A bunch of opponents)

हेही वाचा – Congress VS BJP : बावनकुळेंकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याचं मान्य करतानाच देशाचं आर्थिक गणित फसलं आहे, याचीच कबुली एकप्रकारे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आहे. याबाबत त्यांचे आभार! देशाच्या अर्थमंत्र्यांकडेच पैसे नसतील तर आज सामान्य माणसांची काय अवस्था असेल, याची कल्पना यावरून येते. नरेंद्र मोदींसारखा ब्रँड असूनही आणि अर्थमंत्री म्हणून दहा वर्षे सर्वोत्तम कामगिरी करूनही खुद्द अर्थमंत्र्यांनाही निवडून येण्यासाठी पैशांची गरज लागावी, हे आश्चर्यजनकच आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. 

हेही वाचा – Govinda : कलावंताच्या अपमानाची परतफेड करावी लागेल; मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना इशारा

काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

एका कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारामन निवडणूक न लढण्याच्या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, मी एक आठवडा, दहा दिवस विचार केल्यानंतर उमेदवारीबाबत नाही असे उत्तर दिले. कारण माझ्याकडे आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमध्ये निवडणूक लढवण्यासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढे नाही आहेत. मी अर्थमंत्री असले तरी निधी हा देशाचा असतो, माझा नाही. माझ्यासाठी माझा पगार, माझी कमाई आणि बचत आहे, असं उत्तर निर्मला सीतारामन यांनी अन्य एका प्रश्नाला दिलं.

First Published on: March 28, 2024 10:14 PM
Exit mobile version