घरमहाराष्ट्रGovinda : कलावंताच्या अपमानाची परतफेड करावी लागेल; मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना इशारा

Govinda : कलावंताच्या अपमानाची परतफेड करावी लागेल; मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना इशारा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्यात उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच स्टार प्रचारकांच्याही याद्या जाहीर केल्या जात आहेत. खासदार, आमदारांसह नेतमंडळी विविध पक्षात पक्षप्रवेश करत आहेत. अशातच आज (28 मार्च) बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र गोविंदा शिवसेनेत प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली होती. या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Govinda Ahuja An artists insult has to be repaid Chief Minister Eknath Shindes warning to Jayant Patil)

हेही वाचा  – Shiv Sena : अभिनेता गोविंदा अहुजा यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

- Advertisement -

गोविंदा शिवसेनेत प्रवेश करण्याच्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले होते की, गोविंदाचे चित्रपट सध्या चालत नाहीत. त्यांचा शेवटचा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर नवीन काहीतरी ते करत आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांनी चालणारा नट तरी घ्यावा, असा टोला लगावला होता. जयंत पाटील यांच्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांना जयंत पाटील यांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांच्यापेक्षा तरी चांगला कलाकार आहे ना हा? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे म्हणाले की, कलाकाराचा कधी अपमान करू नये. माणसाचे दिवस कधी फिरतात हे माहित पडत नाही. त्यामुळे आपण 360 विचार करायचा असतो. एका कलाकाराचा अपमान म्हणजे सिनेसृष्टीचा अपमान आहे. त्यामुळे जे बोलले आहेत, त्यांना त्याचं भुगतान करावं लागेल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : कट्टर विरोधकांची शिवनेरीवर भेट; अमोल कोल्हेंनी अढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला

उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी गोविंदाचे नाव चर्चेत

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदाचे नाव चर्चेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गोविंदा हा याआधी याच मतदारसंघातून निवडणूक लढला होता आणि तो विजयी देखील झाला होता. त्यामुळे यंदा तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहितीही काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याशिवाय गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती होती. अशातच आज गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -